भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल : भाजप-मनसे युती होणार ?

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

नागपूर, वृत्तसंस्था| नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीहून नागपूरला दाखल झाले आहेत. नागपूर विमानतळावर येताच मीडियाने त्यांच्या भोवती गराडा घातला. यावेळी त्यांना मनसेसोबत मुंबई महापालिकेत युती होणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर, योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का? या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे.

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. नागपूरला परतलेल्या देवेंद्र फडणवीसांना मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं. चंद्रकांत दादांचं विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असं देखील फडणवीस पुढे म्हणाले.

“राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या बळावर सत्ता येणे नाही. आमची जुनीच ओळख आहे. योग आला, तर त्यांना नक्की भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. पण, जोवर मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही, तोवर हे शक्य नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. याच वेळी महापालिकेच्या निवडणूका अद्याप फार दूर आहेत, असंही ते म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!