भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

बारावीनंतर इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला मिळणार थेट प्रवेश : सीईटीची अटही रद्द !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुंबई, वृत्तसंस्था: बारावीत विशिष्ट असे विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला थेट प्रवेश मिळणार आहे. यासाठी आत्तापर्यंत आवश्यक असलेल्या पात्रतेत बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि आज जाहीर केला आहे. या निर्णयामुळे निश्चित केलेले कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, तसेच या अभ्यासक्रमासाठी सीईटीही घेतली जाणार नाही अशी माहितीही त्यांनी काल मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात यापूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे अशी अट होती. ती आता बदलून शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या इ. बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कॉम्पुटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल होकेशनल, अग्रिकल्चर, अभियांत्रिकी ग्राफिक्स,बिझनेस स्टडीज, एंटरप्रीनरशिप या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या रिक्त राहिलेल्या आर्थिक मागास प्रवर्गाच्या (ई डब्ल्यु एस) जागा थेट द्वितीय वर्षाच्या रिक्त जागांमध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहेत. अशा प्रथम वर्षाच्या रिक्त राहिलेल्या ई डब्ल्यु एस. प्रवर्गाच्या जागा ई डब्ल्यु एस प्रवर्गाच्या उमेदवारांना थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी उपलब्ध होणार असून थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी जागा वाढणार आहेत. पदविका शिक्षण संस्थांमध्ये काश्मिरी विस्थापितांबरोबरच, काश्मीरमधून विस्थापित न होता काश्मीर खोऱ्यांमध्ये राहत असलेल्या काश्मिरी पंडित / काश्मिरी हिंदू कुटुंबे (निवासी) आणि ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र आहे. अशा उमेदवारांना प्रवेशासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.

10 वी व 12 वीच्या विद्यार्थांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या मूल्यांकन व निकालाच्या आधारे मंडळामार्फत गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे या गुणपत्रकाच्या आधारेच दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताना 10 वी व 12 वीच्या गुणांचा विचार करण्यात येणार आहे. तसेच अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण मराठी भाषेमध्ये शिकण्याचा पर्याय यावर्षी राज्यात पहिल्यांदाच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रथम वर्षाच्या रिक्त राहिलेल्या ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या जागा थेट द्वितीय वर्षाच्या रिक्त जागांमध्ये ग्राह्य धरण्याबाबत तरतूद पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या ज्या प्रथम वर्षाच्या आर्थिक मागास प्रवर्गासाठी (ईडब्ल्यूएस) आरक्षित जागा रिक्त राहतील अशा जागा दुसऱ्या वर्षीदेखील थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठीही ईडब्ल्यूएससाठी आरक्षित राहतील. त्यामुळे ईडब्ल्यूएससाठी द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठींच्या जागांमध्ये वाढ होईल.

महाराष्ट्र विना अनुदानीत खाजगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क विनियमन) अधिनियम – 2015 नुसार समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विजय लखीचंद आचलिया अध्यक्ष आहेत. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले, सनदी लेखापाल मनोज चांडक, परिव्यय लेखापाल रत्नाकर फडतरे, व्यवसायिक शिक्षण तज्ज्ञ धर्मेंद्र मिश्रा, यांची या समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पुढील पाच वर्षासाठी नियुक्त करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!