भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

लसींचा तुटवडा; १ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण सुरु होणार नाही

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई वृत्तसंस्था : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण केलं जाणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्रात लसींच्या तुडवड्यामुळे १ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण सुरु होणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या अखेरीस हे लसीकरण सुरू होणार असून, ते पूर्ण होण्यासाठी तब्बल सहा महिने लागतील. 

मंत्रिमंडळाची बैठकी नंतर माध्यमांशी बोलताना टोपे यांनी सांगितलं. की, राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात १ मे रोजी लसीकरण करण्यात येणार नसल्याचं सांगितलं. मे अखेरीपर्यंत लस मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळेल. त्यासाठी प्रत्येक वयोगटानुसार केंद्र तयार केले जाणार असल्याची माहिती टोपेंनी दिली. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे.

राज्यातील १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण साठी राज्यात ५ कोटी ७१ लाख लोक १८ ते ४४ वयोगटातील आहेत. त्यांना मोफत लस देण्यात येणार आहे. शंभर टक्के लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याला दोन कोटी डोस विकत घ्यावे लागणार आहेत. एका लसीसाठी ४०० रुपये आकारले जातात. त्यानुसार २ कोटी डोससाठी अंदाजे ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सहा महिन्यात लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यात लसीकरण करायचं म्हटलं तर १२ कोटी डोस द्यावे लागतील. म्हणजे दर महिन्याला २ कोटी डोस द्यावे लागणार आहेत. यासाठी आम्ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांशी पत्रव्यवहार केला आहे. या कंपन्यांकडे लशीची मागणी करण्यात आली आहे.  आमच्या आरोग्य विभागाच्या १३ हजार संस्था असून त्यांच्या माध्यमाधून दिवसाला १३ लाख डोस देण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

लसीकरणासाठी कोविन Appवरून अपॉईंटमेंट घेणं सक्तीचं आहे. त्याशिवाय लस मिळणार नाही. उठून कोणीही लसीकरणासाठी येईल असं होणार नाही. त्यासाठी कोविन Appवर तुम्हाला नोंदणी करावीच लागेल. केंद्र सरकारचे तसे आदेशच आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर कुणीही गर्दी करू नये, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!