भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

” हे राजकीय षडयंत्र : जाणीवपूर्वक माझ्या परिवाराला छळण्याचा प्रयत्न”– एकनाथ खडसें

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुंबई, प्रतिनिधी |एसीबीने क्लीन चीट दिली असतांनाही आता सुरू असलेली कारवाई राजकीय हेतूने सुरू असून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली असून हे राजकीय षडयंत्र आहे. असा हल्लाबोल माजी मंत्री एकनाथराव खडसे ईडीच्या चौकशीसाठी जात असताना केला.

खडसे यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना काल सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. त्यांना पाच दिवसांची कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यातही ईडीने चौकशी केली होती. आता पुन्हा एकदा चौकशीसाठी खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. “ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मी जात आहे आणि नेहमीच ईडीला सहकार्य केले आहे. आजही ज्या प्रश्नांबाबत चौकशी करण्यात येईल त्याबाबत मी उत्तर देणार आहे. ज्या भूखंडाबाबत चौकशी सुरु आहे तो मुळात वादग्रस्त आहे. एमआयडीसीचा भूखंड असल्याचे सांगून अद्याप त्याचा ताबा त्यांच्याकडे नाही. भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीतर्फे केलेली नाही. आता एमआयाडीसी या जागेवर दावा करत आहे. भूखंडाबाबत मोबदला दिल्याचे एमआयडीसीने दाखवून द्यावं त्यानंतर हा प्रश्न राहणार नाही,” असे खडसे यांनी म्हटले आहे.

“मुळात खाजगी व्यवहार असल्याचे याची आधी ५ वेळा चौकशी झाली आहे. आता ५ वर्षानंतर पुन्हा ईडीच्या माध्यमातून याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. मी भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतरच ही प्रक्रिया सुरु झाली. मला हेतुबद्दल शंका आहे. गेल्या ८ दिवसांपासून जळगामध्ये कुछ होने वाला हे असा मेसेज फिरत आहे याचा अर्थ कार्यकर्त्यांना याची माहिती होती. या कारवाईमागे राजकीय वास मला येतोय आणि जाणीवपुर्वक माझ्या परिवाराला छळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राजकीय हेतुने हे सुरु असून मी याबाबतच्या चौकशीला सामोरे जाणार आहे,” असे खडसे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!