खडसे यांनी माझ्याकडे कुठलाही राजीनामा दिला नाही- चंद्रकांत पाटील
जळगाव (विशेष प्रतिनिधी)। भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा असतांना सोशल मीडियामध्ये एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्याने खळबळ उडाली होती, परंतु भाजपा प्रदेशाध्यक्ष यांना थेट संपर्क साधला असता एकनाथ खडसेंनी राजीनामा दिलेला नसल्याची माहिती स्वतः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोनवरून मंडे टू मंडे ला प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियामध्ये एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता, परंतु राजीनामा द्यायचा झाला तर तो प्रदेशाध्यक्षांकडे पाठवायचा असतो, माझ्यापर्यंत त्यांचा राजीनामा अद्याप आलेला नाही, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटलांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ खडसे असं काही करणार नाहीत, याबद्दल मी ठाम असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. नाथाभाऊंचे स्विय सहाय्यक योगेश कोलते सर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताचे खंडन केले असून तसेच भाऊंनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.