भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

१० ऑगस्टपर्यंत शिंदेना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार करत, अजित पवारांना केलं जाईल– चव्हाण

Monday To Monday News Network|

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : येत्या १० तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी एकनाथ शिंदे हे अपात्र ठरून मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होतील. त्यानंतर आगामी लोकसभेची निवडणूक ही अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाईल, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तविला आहे.

माझं आकलन असं आहे की, भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्त्वासाठी लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीमुळे मोदी सत्तेत राहणार की नाही, हे ठरणार आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या बाहेर आपला प्रभाव पाडू शकलेले नाहीत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकारला लोकसभा निवडणुकीला सामोरे जाता येणार नाही, ते उचित ठरणार नाही, असे भाजपचे राजकीय गणित असल्याचे माझे आकलन आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते सोमवारी विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपने अजित पवार यांना घेऊनच आगामी राजकारणाची आखणी केल्याचे भाकीत वर्तविले. आता आपण अजित पवार यांना सरकारमध्ये सामावून घेतलेच आहे तर लोकसभेची जबाबदारी त्यांच्यावरच द्यावी, असा भाजपच्या नेतृत्त्वाचा निर्णय झाला आहे. तो निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतराबाबत निर्णय देतील, तेव्हा अंमलात येईल. त्यामुळे १० ऑगस्ट किंवा त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचे निलंबन होईल. त्यानंतर मुख्यमंत्रीपद रिक्त होईल आणि त्याठिकाणी अजित पवार विराजमान होतील. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला अजित पवार यांची गरज आहे. वापरा आणि फेकून द्या, नरेंद्र मोदी यांची स्टाईल आहे. एकनाथ शिंदे यांचा वापर करुन झाला आहे, त्यांची उपयुक्तता संपली आहे. आता पुढची उपयुक्तता कोणाची आहे, हे पाहिले जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!