भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

विधानसभेच्या निकालानंतर काय होईल सांगता येत नाही, शरद पवार-एकनाथ शिंदेचं काहीतरी चाललंय; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार?

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात काय होईल, हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात सध्या वेगळंच काहीतरी सुरु आहे. वेगवेगळी चर्चा या महाराष्ट्रात सुरु आहे. महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल, हे आता ठामपणे सांगता येणार नाही. शरद पवार (Sharad Pawar) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यातही काहीतरी सुरु आहे, अशी जोरदार चर्चाही आहे. विधानसभेच्या निकालानंतर कोण कोणासोबत राहील, हेदेखील सांगता येत नाही, असे वक्तव्य अजितदादा गटाचे नेते नवाब मलिक यांनी एका मुलाखतीत केले. 

नवाब मलिक यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. सध्याची परिस्थिती पाहता निकालानंतर कोणता पक्ष कोणासोबत जाईल, हे सांगता येत नाही. विधासभा निवडणुकीनंतर अजित पवार हे किंगमेकर असतील, हे मी आताच सांगतो. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सगळे लोक माझ्याकडे उभे असतील. तुम्ही तोपर्यंत वाट पाहा, असे नवाब मलिक यांनी सांगितले. मात्र, नवाब मलिक यांनी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असल्याचे वक्तव्य करुन राजकारणात नवा ट्विस्ट आणला आहे. नवाब मलिक यांच्या या वक्तव्याचे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

अणुशक्ती नगरमध्ये गेल्या काही वर्षांपासून माझी मुलगी सना हिने कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांशी उत्तमप्रकारे संवाद साधायला सुरुवात केली होती. या मतदारसंघातील अनेक लोक माझ्याऐवजी सनाला भेटायला यायचे. त्यामुळे मी आता निवडणूक लढायची नाही, असे ठरवले. परंतु, शिवाजीनगर-मानखुर्द नगरमधील जनतेने मला या मतदारसंघातून लढण्याचा आग्रह धरला. या मतदारसंघात एखाद्या चित्रपटात दाखवतात, तशी परिस्थिती आहे. याठिकाणी प्रचंड गुंडगिरी, नशेखोरी आणि हुकूमशाही आहे. या सगळ्याला जनता कंटाळली आहे. त्यामुळे मी लोकांच्या आग्रहाखातर शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!