मी पुन्हा येईन…. राज्यात राजकारणात मोठ्या भूकंपाचे संकेत !
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिवाळीआधीच फटाके फुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक सुचक ट्वीट केलं आहे. ‘मी पुन्हा येईन…’ असं म्हणत एकच खळबळ उडवून दिली आहे. राज्यात या बाबत मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते.त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीत आले होते. त्यानंतर आज भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुचक ट्वीट केलं आहे. मी पुन्हा येईन…असं म्हणणारा देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
या ट्वीटमध्ये महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन, असा मजकूर लिहिला आहे. त्यामुळे या ट्वीटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आता नक्की काय होणार,देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चाही सुरू आहे.