विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा लांबणीवर
मुंबई : सातवा वेतन आयोग आणि आश्वासित प्रगती योजना इत्यादी मागण्यांसाठी गेल्या ४ दिवसांपासून लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. राज्यातील १४ विद्यापीठातील अधिकारी कर्मचार्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसला आहे. राज्यातील अनेक विद्यापीठांनी अंतिम वर्षातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.
राज्यातील १४ विद्यापीठांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तब्बल १७ हजाराहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील बहुतांश विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा संकटात सापडल्या आहेत. यामुळे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठांनी १ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या अंतिम वर्षांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे