ग.स. सोसायटीच्या निवडणुकीत नव्या समीकरनाच्या नांदी चे संकेत
जळगाव (प्रतिनिधी)। ग.स. सोसायटीची निवडणूक येऊ घातली असतानाच विरोधी सहकार गटाला सत्ताधारी लोकसहकार गटातील ५ संचालकांनी साथ देत अध्यक्ष मनोज पाटलांविरूद्ध बंड ठोपाटल्याने सहकारातील नव्या समीकरनाची नांदी चे संकेत असल्याचे स्पष्ट होत आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निवडणूक घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी असलेल्या ग.स. सोसायटीत संचालक मंडळांचा कार्यकाळ जून २०२० मध्ये संपला असल्याने लवकरच ग.स.च्या २१ जागांसाठी निवडणूक होऊ घातली असल्याने जिल्हा उपनिबंधकांकडे गुरुवारी लोकसहकार गटाकडून ग.स.सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष सुनील अमृत पाटील, लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर, तुकाराम बोरोले, विश्वासराव सूर्यवंशी, सुनील पाटील या ५ जणांनी राजीनामा दिला असून अध्यक्ष मनोज पाटील मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे तर विरोधी सहकार गटाचे गटनेते उदय पाटील, कैलासनाथ चव्हाण, अजबसिंग पाटील, महेश पाटील, देवेंद्र पाटील, रागिणी चव्हाण, विक्रमादित्य पाटील, भाईदास पाटील विद्यादेवी पाटील, या ९ संचालकांनी राजीनामा दिला आहे.