कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव”
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री मंडळात भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे, असा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे, कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव असल्याचा गंभीर दावा करण्यात आलाय आहे.
मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक धक्कादायक निर्णय घेत जुन्या मंत्र्यांना पॅव्हिलियनमध्ये पाठवून नव्या दमाच्या नेत्यांच्या मंत्रिपदाची इनिंग खेळण्याची संधी दिली. यात प्रीतम मुंडे याचंही नाव आघाडीवर होतं. मात्र त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. याच पार्श्वभूमीवर मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहे. कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव असल्याचा असं अग्रलेखात म्हटलंय.
मुंडे भगिनी ह्या वंजारी समाजातून येतात. भागवत कराडही वंजारी समाजातूनच येतात. पंकजा मुंडेंचा
पराभव झाल्यानंतर वंजारी समाज भाजपावर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. एवढच नाही तर
पंकजा मुंडे यांनीही पक्षावर उघड उघड नाराजी व्यक्त केली. त्याच पार्श्वभूमीवर पंकजांना विधान परिषदेवर
घेतलं जाईल अशी जोरदार चर्चा सुरु झाली. पण प्रत्यक्षात लातूरच्याच रमेश कराड, जे भाजपातून
राष्ट्रवादीत आणि पुन्हा भाजपात आले होते, त्यांना आमदार केलं गेलं. म्हणजे चर्चा पंकजांची आणि आमदारकी रमेश कराड यांना. रमेश कराडही वंजारी समाजातून येतात.
चर्चा प्रीतम मुंडेंची, लॉटरी कराडांना
आताही मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची जशीही बातमी आली तशी प्रीतम मुंडे यांना मंत्री केलं जाईल अशी
चर्चा सुरु झाली. पण प्रत्यक्षात भाजपानं राज्यसभेवर घेतलेल्या भागवत कराडांना मंत्री केलं. भागवत
कराड हे औरंगाबादचे दोन वेळेस महापौर राहीले. गोपीनाथ मुंडेंनी त्यांना आमदारकीचं तिकिटही
दिलं होतं पण ते निवडूण नाही आले. त्यानंतर आता भाजपानं प्रीतम मुंडेंऐवजी भागवत कराडांना
केंद्रातल्या मंत्रीपदासाठी पसंती दिली. सामनातल्या अग्रलेखात यावरच बोट ठेवण्यात आलंय. प्रीतम मुंडेंऐवजी भागवत कराडांना मंत्रिपद म्हणजे वंजारी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न तसच पंकजा मुंडें यांना
संपूर्ण खतम करण्याचा हा डाव असल्याचं सामनात म्हटलं गेलंय.