सावदा येथे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाची बैठक संपन्न,गावागावात शाखा सुरू करणार
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा येथे दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र लेवा पाटीदार, महासंघाची बैठक डॉक्टर श्री विजय वारके यांच्या दवाखान्याच्या बेस मेंट मध्ये पार पडली. यावेळेस रावेर तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रतिनिधी प्राथमिक चर्चा करण्यासाठी एकत्रित आले होते. सदर सभेस उपस्थित. महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष श्री अरुण बोरोले, कोषाध्यक्ष डॉ मिलिंद पाटील,सल्लागार सदस्य श्री डॉ प्रमोद महाजन ,नाशिक व,श्री बंडू दादा काळे, जळगाव, श्री नितीन इंगळे, उद्योजक जळगाव, श्री महेंद्र पाटील व प्रकाश वराडे महासंघाचे खानदेश विभाग संयोजक, महासंघाचे नियुक्त सदस्या, सौ. ज्योती महाजन, सौ नीता वराडे, सौ सीमा गाजरे, सौ संगीता भोळे, सौ. नीलिमा राणे, जळगाव , श्री रितेश भारंबे भुसावळ हे उपस्थित होते.
तरुण कार्यकर्त्यांनी यासाठी पुढे आले पाहिजे असा एकंदरीत सुर उमटला. मान सन्मान हार गुच्छ यांना बगल देत थेट चर्चा सत्रा स सुरुवात झाली.
सदर प्रसंगी लेवा महासंघाच्या शाखा गावा गावात तयार झाल्या पाहिजे , संपूर्ण समाज हा एका छताखाली, आणि एक जुट झाला पाहिजे, या अनुषंगाने चर्चा झाली.
या महासंघाच्या वैचारिक बैठकी नुसार मुळातच समाजासाठी सर्वांनी काहीतरी देण लागत, समाज एकत्रित होवून एकमेकास कसे सहकार्य करता येईल , समाजातील तरूण, तरुणी, बेरोजगार , समाजातील उद्योजक, शेतकरी यांच्यासाठी उपाययोजना करून प्रत्येक घटकाचे कसे उत्थान होईल याकडे लक्ष देवून कार्य केले पाहिजे असे विचार मांडले गेले.
रावेर तालुक्यातील एकूण २० गावचे लेवा पाटीदार समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते . उपस्थितां पैकी श्री अरुण बोरोले , डॉ महाजन, डॉ व्ही जे वारके , अड संदीप भंगाळे, डॉ सुधाकर चौधरी, तरूण उद्योजक रितेश पाटील , बंडू दादा काळे यांनी आपले विचार मांडले. या मीटिंग ला मस्कावद हून प्रवीण वारके सर, देवेंद्र पाटील, संतोष पाटील, महेंद्र पाटील, खिरोद्याहून किशोर चौधरी, प्रतीक नारखेडे, सागर नेहेते, महेंद्र चौधरी, आमोदा येथून उमेश पाटील, थोरगव्हाण हून विलास चौधरी, योगेश झोपे, उमाकांत बाऊ स्कर , नंदकुमार चौधरी, गोविंद चौधरी, युवराज चौधरी, गाडेगाव येथून रामानंद वारके, अट्रावल हून पवन राजे चौधरी, सावदा, अनिल भारंबे, इंदूर हून रविन्द्र चौधरी, श्याम पाटील व अनेक गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित होते. नंदकिशोर पाटील,सर यांनी कार्यक्रमच प्रास्ताविक व आभार मांडले. तर सूत्रसंचालन डॉ . मिलीन्द पाटील यांनी केले.