भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीयरावेर

भाजपा रावेर व जळगांवच्या विद्यमान खासदारांना घरचा रस्ता दाखवणार ? या जागांवर नविन चेहरे दिसणारं

Loksabha Election 2024 | मंडे टू मंडे न्यूज | देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून महायुतीचे जागावाटप फॉर्म्युला अजुन जाहिर करण्यात आलेला नाही अश्यात भाजपच्या विद्यमान खासदारांची (BJP Sitting MP) धाकधूक चांगलीच वाढलीय. भाजप (BJP) पक्षाकडून राज्यातील विद्यमान खासदारांचे पक्षअंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले आहेत. ज्यात डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती समोर येत आहे. अश्या खासदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता असून यासदर्भातील काहीं नावे समोर आली आहेत यात रावेरच्या खासदार रक्षा खडसे व जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचाही समावेश असल्याने त्यांचा पत्ता कट होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

नेहमीप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपकडून धक्कातंत्र वापरल्याचे पाहायला मिळू शकते अश्यात रावेरच्या खासदार रक्षा खडसे व जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचा जागी नविन चेहरा मैदानात उतरवला जाऊ शकतो रावेर जागेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्याऐवजी अमोल जावळे किंव्हा डॉ. केतकी पाटील यांचे नाव आघाडीवर आहेत. तर जळगाव जागेसाठी उन्मेष पाटील यांच्याऐवजी मंगेश चव्हाण, ए. टी. पाटील, स्मिता वाघ, दिलीप पाटील, रोहित निकम यांचा पर्याय दिला जाऊ शकतो.

पुढील दोन-तीन दिवसांत दिल्लीतून भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षात कशी राहिली सामाजिक समिकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी, निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता, 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, हाच निकष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून डोळ्यासमोर ठेवण्यात आलेला आहे. येत्या दोन दिवसांत भाजपची जी उमेदवारांची यादी येण्याची शक्यता आहे, त्यामध्ये काही नवीन नावं दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

विद्यमान खसदारां पैकी या जागांवर दिसू शकतात नवीन उमेदवार

उत्तर मुंबई
उत्तर मध्य मुंबई
जळगाव
रावेर
बीड
धुळे
सोलापूर
सांगली
लातूर
नांदेड
अहमदनगर
वर्धा

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!