भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यातल लॉकडाऊन वाढणार: बैठकी नंतर निर्णय, वडेट्टीवार यांचे संकेत !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई वृत्तसंस्था: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २२ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यास लॉकडाऊन वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवी नियमावली लागू होण्याची शक्यता असून लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिले आहेत.

१ मे रोजी राज्यातील लॉकडाऊन संपेल अशा आशेवर राज्यातील नागरिक होते. मात्र विदर्भ, मराठवाड्यातील परिस्थितीकडे आता लक्ष न दिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. मुंबईतील रुग्णसंख्या घटत असली तरी राज्यातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत बिकट अवस्थेत असून रुग्णसंख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यावर निर्णय होणार असल्याचे विजय वड्डेटीवार यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊन नंतर मुंबई, ठाण्यात रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र विदर्भ, मराठावाडा आणि बाकीच्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी होतानाची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे राज्यतील लॉकडाऊन वाढविण्याविषयी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट संकेत मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!