Big Breaking: राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार !
Monday To Monday NewsNetwork
मुंबई वृत्तसंस्था। राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊन सुरु आहे. हा लॉकडाऊन ३० एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. १५ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज राज्य सरकारच्या मंत्रीमडळाची बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपेंनी माहिती दिली.
ब्रेक द चैन अंतर्गत राज्यात लॉकडाऊन केलं आहे. आज सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणीच मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या निर्णयाबद्दल सहमती दर्शवली आहे.कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन वाढवावं लागेल, अशी परिस्थिती आहे. सर्व मंत्री लॉकडाऊन वाढण्याच्या मताचे आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी लॉकडाऊन १५ दिवस वाढवायचं की काय करायचं, याचा निर्णय घेतला जाईल, असं टोपे म्हणाले. लॉकडाऊन हे वाढणारच आहे. हे लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढेल असा माझा अंदाज आहे, असं टोपे यांनी सांगितलं.