भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेतल्यास गुन्हा दाखल करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे

मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।

मुंबई: (प्रतिनिधी)। गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

राज्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन व कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात रात्री आठ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली असून मॉल्स, हॉटेल, चित्रपटगृहे व इतर दुकाने देखील रात्री आठच्या आधीच बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने लागू केले आहेत.

पत्रकारांशी ते बोलताना त्यांनी म्हटल की, राज्यभरात सर्वत्र कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशावेळी खाजगी रुग्णालयाकडे रुग्णांना जावं लागतंय. मात्र तिथेही रुग्णांकडून भरमसाठ डिपॉझिट आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेणे हा अक्षम्य गुन्हा असून असे डिपॉझिट घेतल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार दिले असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या संकटसमयी अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी डिपॉझिटची मागणी रुग्णालयांकडून सर्रासपणे केली जात असल्याचं निदर्शनास आलं होतं. यामुळे अनेक रुग्णांची अडचण होत होती. काहींना उपचार घेणेही कठीण जात होते. हीच गोष्ट लक्षात घेत खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून डिपॉझिट घेतल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची महत्वाची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना उपचार घेणे सोपं होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!