झिरो तलाठी भाऊसाहेब आढळल्यास तलाठ्यावर शिस्तभंगाची कारवाई– शासन निर्णय
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी): इतरत्र राहून गावाचा कारभार पाहणाऱ्या तलाठी भाऊसाहेबाला प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे,महसूल व कर विभागाने पत्रक काढून कोणत्याही तलाठ्याने खाजगी व्यक्ती ठेऊन काम करून घेताना आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.शासनाच्या आदेशामुळे गावागावात झिरो कर्मचारी ठेऊन उंटावरून शेळ्या चारणाऱ्या तालाठ्याला दणका बसलाय.
अनेक गावांत तलाठी कार्यालयात तलाठी,खाजगी व्यक्ती झिरो तलाठी म्हणून ठेवत असतात,म्हणजे तलाठी हजर नसले तरी कार्यालय मात्र सुरू,महसूल प्रशासन व जनतेचा दुवा म्हणून तलाठ्या कडे पाहिले जाते पण गाव पातळीवर अनेक गावचे तलाठी भाऊसाहेब साजेच्या गावी न राहता तालुक्यात बसून काम पाहात होते ,प्रत्येक गावात खाजगी व्यक्ती हाताखाली ठेऊन त्याच्या जीवावर अनेक तलाठ्याचा कारभार चालत आहे ,ही बाब शासनाच्या लक्ष्यात आल्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महसूल विभागाने नुकतेच एक पत्रक काढून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागी राहण्याचा सुचना दिल्या आहे,
ज्या दिवशी तलाठी गाव सोडून बाहेर जाणार आहे त्या दिवसाचा नियोजित ,दैiरा ,बैठका या बाबत ची माहिती कार्यालयाच्या सूचना फलकावर लिहून बाहेर जावे लागणार आहे. तलाठ्याची कर्तव्ये,जबाबदाऱ्या सूचना फलकावर लिहिण्याचेही आदेश देण्यात आले आहेत,त्याच बरोबर स्वतःचा मोबाईल क्रमांक, मंडलाधिकारी व नायब तहसीलदार याचा मोबाईल नंबर,सूचना फलकावर लिहिण्यात यावा,असे आदेश देण्यात आले आहेत,
तर होणार शिस्तभंगाची कारवाई :- सेवाहमी कायद्याअंतर्गत सर्व बाबीची माहिती कार्यालयाच्या आवारात लावण्यात यावी व त्याच प्रमाणे शुल्क आकारणी करावी , तलाठी कार्यालयात खाजगी व्यक्तींना कार्यालयीन कामकाज करण्यासाठी ठेऊ नये,खाजगी व्यक्तींना कार्यालयीन कामकाजासाठी ठेवले तर संबधित तलाठ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी,असे आदेश शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.