भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

फडणवीस-राऊत भेटीनंतर, पवार अलर्ट; मुख्यमंत्र्यांसह तातडीची बैठक

मुंबई (वृत्तसंस्था)। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पाऊण तास बैठक चालली. या बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच शरद पवार आणि उद्ध ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडल्याने चर्चांणा उधाण आलं आहे.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल २६ सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये तब्बल दोन तास बैठक चालली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, सुरुवातीला या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याची दोन्ही पक्षांनी नाकारली. त्यानंतर संजय राऊत यांनी भेट झाल्याचं सांगितलं. संजय राऊत यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सरकार बनवण्याची सध्या कोणतीही घाई भाजपला नाही, केवळ सामनाच्या मुलाखतीसाठी भेट झाली असं सांगितलं. मात्र, दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर शरद पवार अलर्ट झाले असून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची वर्षावर भेट घेतली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देताना, “शिवसेनेत गुप्त बैठक करण्याची पद्धत नाही. मला सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यायची आहे. महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यविषयक संस्थांचीही इच्छा आहे, की मी संपादक म्हणून फडणवीसांची जाहीर मुलाखत करावी. त्यासंदर्भात चर्चा केली,” असं सांगितलं. राजकारणात वैयक्तिक शत्रुत्व नसतं आणि आम्ही काही वैयक्तिक शत्रू नाही. भाजपसोबत असतानाही मी शरद पवारांशी बोलायचो. उद्धव ठाकरे आजही नरेंद्र मोदींना आपले नेते म्हणतात, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत, असं देखील संजय राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!