भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

पालकमंत्री निवडीआधी ध्वजारोहणासाठी “या” मंत्र्यावर “या” जिल्ह्याची जबाबदारी

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : येत्या स्वांतत्र्यदिनासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी सरकारी ध्वजारोहण कार्यक्रम जाहीर झाला असून मात्र मंत्र्यांना अद्याप जिल्ह्यांचे वाटप झाले नसल्याने कोणता मंत्री 15 ऑगस्टच्या दिवशी कोठे जाणार, याची उत्सुकता होती. यासाठी मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरुन आता ही यादी म्हणजेच पालकमंत्रीपदांची यादी असल्याची चर्चा सुरु आहे.

१५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी १९ जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करणार? याची यादी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं जे मंत्री ज्या जिल्ह्यात ध्वजारोहण करतील तेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १९ जिल्ह्यांव्यतिरिक्त जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वाजारोहण करणार आहेत.

या जिल्ह्यामध्ये हे मंत्री ध्वजारोहण करणार–

  1. देवेंद्र फडणवीस – नागपूर
  2. सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
  3. चंद्रकांत पाटील – पुणे
  4. राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
  5. गिरीश महाजन – नाशिक
  6. दादा भुसे – धुळे
  7. गुलाबराव पाटील – जळगाव
  8. रविंद्र चव्हाण – ठाणे
  9. मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
  10. दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
  11. रत्नागिरी – उदय सामंत
  12. अतुल सावे – परभणी
  13. संदीपान भुमरे – औरंगाबाद
  14. सुरेश खाडे – सांगली
  15. विजयकुमार गावित – नंदुरबार
  16. तानाजी सावंत – उस्मानाबाद
  17. शंभुराज देसाई – सातारा
  18. अब्दुल सत्तार – जालना
  19. संजय राठोड – यवतमाळ

तर अमरावती जिल्ह्यात विभागीय आयुक्त आणि कोल्हापूर, रायगड, बीड, हिंगोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अकोला, सोलापूर, लातूर, वाशिम, बुलडाणा, पालघर आणि नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!