कार्यकारी अभियंत्यांनी स्वत:ला मजूर दाखवून लाटले लाखोंचे अनुदान !
शेतात विहीर बांधण्यासाठी चक्क कार्यकारी अभियंता ३ लाखांचे अनुदान लाटले
धुळे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | स्वतःला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत मजूर दाखवत MSRDC मध्ये कार्यकारी अभियंता वर्षा पवार यांनी चक्क शेतात विहीर बांधण्यासाठी सरकारकडून तीन लाख रुपयांचं अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वर्षा पवार या MSRDC मध्ये कार्यकारी अभियंता आहेत. साक्रीचे माजी आमदार डी. एस. अहिरे यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी चक्क शेतात विहीर बांधण्यासाठी सरकारकडून तीन लाख रुपयांचं अनुदान लाटलं. सर्वात धक्कादायक म्हणजे हे अनुदान मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत मजूर आहे असं कागदोपत्री दाखवलं.
२०१७-१७ मधला हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते आनंद लोंढे यांच्या तक्रारीनंतर उघडकीस आला. तक्रार दिल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर चौकशी करण्यात आली, त्यानंतर वर्षा पवार यांनी तीन लाख रुपयांची रक्कम शासनाला परत केली. त्यांच्यावर काय कारवाई होते ते पाहायचं.