भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराजकीय

ही तर मोगलाई आहे, राज्यात आणीबाणी सुरू आहे का ?- भाजपचा संतप्त सवाल

मुंबई (वृत्तसंस्था)। सोशल मीडियावरून राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली म्हणून एका तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यावर भाजपने तीव्र संताप व्यक्त केला असून राज्यात आणीबाणी सुरू आहे का? असा सवाल केला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात मोगलाई आली आहे. डरपोक सरकारने टीकेला घाबरून सुनयना होले या तरुणीला अटक केली. सोशल मीडियावर उद्धव ठाकरे सरकारवर टीका करणे हा महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे. सुशांतप्रकरणी केलेली टीका सरकारला झोंबते. ही तर मोगलाई आहे. राज्यात आणीबाणी सुरू आहे का? असा संतप्त सवाल भातखळकर यांनी केला आहे. सुशांतप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांचे तोंड बंद करण्यासाठी ठाकरे सरकारची तडफड सुरू आहे. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, सुनयना होले नावाच्या महिलेने आपल्या ट्विटर हँडलवरून २५ जुलै रोजी आक्षेपार्ह फोटो व मजकूर पोस्ट केला होता. मुख्यमंत्री ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो एडिट करून पोस्ट करण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांना मौलवीच्या वेशात दाखवण्यात आले आहे तर आदित्य यांच्या फोटोत साप दूध पितानाचा फोटो इन्सर्ट करण्यात आला आहे. त्यानंतर २८ जुलै रोजी आणखी एक ट्विट करण्यात आले असून त्यात अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेचा वापर करण्यात आला आहे. ट्विटमध्ये #SushantSinghRajput #CBICantBeDeniedForSSR हे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. या दोन्ही ट्विटवर तीव्र आक्षेप घेत अॅड. धर्मेंद्र मिश्रा यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून समाज माध्यमाचा गैरवापर करून ज्याप्रकारे बदनामीकारक फोटो व मजकूर पोस्ट करण्यात आला आहे, तो एकप्रकारे महाराष्ट्राचाच अपमान आहे. या पोस्टमुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळेच या प्रकरणी गंभीर दखल घेण्यात यावी व सुनयना होले या महिलेविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत केली होती. सायबर पोलिसांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत भा. दं. वी. कलम १५३ (अ), ५०५ (२), ५००, ५०१, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला व संबंधित महिलेला अटक केली. अटकेनंतर सदर महिलेला जामीनही मिळाला आहे. या महिलेला जामीन मिळावा म्हणून दिल्ली भाजपचे प्रवक्ते ताजिंदर पाल बग्गा यांच्या सांगण्यावरून भाजप युवा मोर्चाचे देवांग दवे यांनी मदत केल्याचेही समोर आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!