भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराजकीय

Breaking: अनिल देशमुखांवर FIR दाखल, सीबीआय कडुन छापे !

मुंबई वृत्तसंस्था: कोरोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राजकीय आघाडीवर मोठा धक्का बसला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणात सीबीआयनं राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून देशमुखांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरन हत्या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक (निलंबित) सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर राज्य सरकारनं पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या होत्या. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त यांच्यावर ठपका ठेवून त्यांचीही या पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचे टार्गेट दिले होते, असे सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते. त्या संबंधीच्या व्हॉट्सअॅप चॅटचे पुरावेही त्यांनी दिले होते. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!