भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

भोसरी जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा : अंतरिम जामीन मंजूर

मुंबई, प्रतिनिधी : पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणात माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणात त्यांना जामीन मिळाल्याने मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

पुणे येथील भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसे कुटुंबीयांची सक्तवसुली संचालनालयांकडून चौकशी करण्यात आली होती समसही बजावण्यात आले होते. यापूर्वी न्यायालयाकडून मंदाकिनी खडसे यांना देखील दिलासा मिळालेला आहे. मंदाकिनी खडसे यांची 19 ऑक्टोबर रोजी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील भोसरी जमीन कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने मंदाकिनी खडसेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता.

रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहित केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!