महाराष्ट्रराजकीय

खडसेंना क्लीन चीट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ?

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुंबई, वृत्तसंस्था : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणात क्लीन चिट देणारा झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब झाला असून अहवाल सापडत नाहीये. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्कांना उधाण आलं असून हा झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाला की कुणी गायब केला? अशी शंका कुशंकाही या निमत्ताने घेतली जात असून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.

भोसरी जमीन व्यवहाराबाबत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यासाठी झोटिंग समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने खडसेंना क्लीन चीटही दिली असल्याचे सांगण्यात आले होते याच प्रकरणात सध्या ईडीकडून खडसेंची चौकशी सुरू आहे. अशावेळी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी हा अहवाल खडसे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, आता हा अहवालाच सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडत नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

भोसरी जमिनीच्या चौकशीसाठी २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समिती नेमली होती. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. झोटिंग समितीने त्यांचा अहवाल ३० जून २०१७ रोजी शासनाकडे अहवाल सादर केला होता. या समितीने खडसे यांना क्लिनचीटही दिली होती. दरम्यान, भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या झोटिंग समितीवर 45.42 लाखांचा खर्च झाला होता. या झोटिंग समितीच्या अहवालात नेमकं काय आहे हे शोधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्य सचिवांना विचारणा केली. त्यावेळी हा अहवाल कुठेच सापडत नसल्याचं अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना कळवलंय. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल गेला कुठे? असा सवाल उपस्थित होतोय. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!