सोबत राहून पाठीत सूरा खुपसताहेत- नाना पटोलेंचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुंबई : राज्यात महाविकासआघाडी एकत्र आहे खरी मात्र, पक्षांमध्ये असलेले मतभेद लपून राहिलेले नाही. मंत्र्यांमध्ये आंतर्गत वाद सुरु असल्याच्या चर्चा असून वेळोवेळी नेत्यांनी खदखद व्यक्तही केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला होता यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याची चर्चा सुरु आहे. यानंतर आता लोणावळ्यातील मेळाव्यात नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांना पाठीत सुरा खुपसायचा असेल तर आपल्याला काय बोलायचे नाही असं वक्तव्य नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना सांगितलं आहे की, कामाला लागा वगैरे परंतु मी बोललो तर त्रास होता आणि ते बोलले तर ठीक आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. मी स्वबळाचा नारा दिला आहे त्यावरुन माघार घेणार नाही. यामुळे आपण आपल्या कामाला लागा.. तसेच अजित पवार यांच्यावर निशाणा साधत नाना पटोले यांनी म्हटलंय की, आता पुण्याचे पालकमंत्री बारामतीवाले आहेत. कुणाचं काम करता ते आपल्या लोकांचं करतात ते काम.. मग आपण म्हणतो संपर्कमंत्र्यांनं लक्ष घालायचं.. संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं कारण त्यांची सही लागते पालकमंत्र्यांची, संपर्कमंत्र्याची सही लागत नाही. कुठल्याही कमिटीवर नावं पाठवायची असतील तर पालकमंत्र्यांची सही लागते हा जो त्रास आहे याला तुम्ही आपली ताकद बनवा परंतु या त्रासामुळे तुम्ही मानसिक कमजोर बनू नका असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नाना पटोले पुढे म्हणाले, ठीक आहे तो आजा आमचा हिस्सा असतानाही देत नाही ना ठिक आहे. मी माझ्या कर्माने इथला पालकमंत्री बनेल ही शपथ सगळ्यांनी केली पाहिजे. आमच्या पक्षाचा माणूस या खुर्चीवर बसेल ही ताकद घेऊन आपण निघालो पाहिजे. ज्या लोकांना समझोताच करायचा नसेल सोबत राहून पाठित सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचे नाही तो रागच आपल्याला ताकद बनवायचा आहे. असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. यामुळे नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे प्रकर्षनाने समोर येत आहे.