भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

नाशिकमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत, 3 नेते शिवसेनेत प्रवेश करणार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (प्रतिनिधी) : राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाडी सुरू असतांना आता नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण आतापासूनच तापले आहे. भाजपने शिवसेनेचा माजी आमदार फोडला होता. त्यानंतर आता सेनेनं जशास तसे उत्तर देत भाजपचे दोन मोठे नेते गळाला लावले असून त्यांच्यापाठोपाठ आता दिनकर पाटीलही सेनेच्या तंबूत दाखल होणार आहे. दिनकर पाटील यांनी भाजपच्या 4 नगरसेवकांसह प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहे.या नेत्यांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश निश्चित समजला जात आहे.

माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. गुरुवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. रात्री उशिरा वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी  संजय राऊत यांची नाशिकमधील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे भेट घेतली. त्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानुसार आज संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास सुनिल बागुल आणि वसंत गीते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

तर दिनकर पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीमुळे दिनकर पाटील यांचा सेनेत प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे. एवढंच नाहीतर भाजपचे 11 विद्यमान नगरसेवक सुद्धा सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे  सभागृहात, सत्ताधारी भाजप अल्पमतात जाण्याचे संकेत मिळत आहे. हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

या नेत्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई देखील उपस्थित होते. सुनील बागुल आणि वसंत गीते दोनही नेते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची आज पुन्हा घरवापसी होणार आहे. परंतु, या दोन्ही नेत्यांची घरवापसी जरी असली तरी भाजपला हा मोठा धक्का समजला जात आहे. मागील महिन्यात माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सानप यांची जागा भरून काढण्यासाठी शिवसेनेनं आता सुनिल बागुल आणि वसंत गीते यांच्या जागा भरून काढण्याचे ठरवले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!