भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

समीर वानखेडेंचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाशी संबंध; नवाब मलिकांचा आरोप

मुंबई, प्रतिनिधी : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अजून एक गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीत एक आंतराष्ट्रीय ड्रग्ज माफीया होता ज्याला सोडण्यात आलं, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत हा आरोप केला आहे. “क्रूझ वरील पार्टी फॅशन टीव्हीने आयोजित केली होती. महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागातर्फे कोणतीही परवानगी घेतली गेली नाही. त्या क्रूझवर टार्गेटेड व्यक्तींचे फोटो देऊन त्यांना ट्रॅप करण्यात आलं. माझ्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीया त्या पार्टीत होता. त्याची प्रेमीका बंदूक घेऊन होती. ती त्या व्हिडिओमध्ये नाचताना दिसत आहे. तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीया दाढीवाला आहे. तो दाढीवाला कोण आहे सर्व एनसीबीवाल्यांना माहिती आहे. काही जणांनी मला माहिती दिली की तो तिहार जेलमध्ये होता. तर काहींनी तो राजस्थानच्या जेलमध्ये देखील होता, असं सांगितलं. हा दाढीवाला कोण आहे हे देखील एनसीबीने पाहावं. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीया क्रूझवर आहे. रेव्ह पार्टी उधळण्यासाठी रेड केली जात आहे. मात्र त्याला सोडलं जातं. दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया समीर वानखेडे यांचा मित्र आहे,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

“काही अधिकारी मला सांगत आहेत की गोव्यात देखील त्यांचं मोठं रॅकेट चालू आहे. पण छापेमारीची जेव्हा वेळ येते तेव्हा वानखेडे पळ काढतात. जे या प्रकरणाचा तपास करायला आले आहेत त्यांनी क्रूझवरील सीसीटीव्ही फूटेज मागवून घ्या. प्रत्येक खोल्यांचा, सर्व डान्सचा सीसीटीव्ही तपासून घ्या. जेव्हा हे सर्व तपासतील तेव्हा जगातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया पार्टीमध्ये होता हे समोर येईल. त्यांनीच पार्टी आयोजीत केली,” असं नवाब मलिक म्हणाले. खेळ तर झाला परंतु खेळातील खेळाडू दाढीसह का फिरत आहे याचं उत्तर एनसीबीला द्यावं लागेल, असं देखील नवाब मलिक म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!