भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

बनावट नोटांचे रॅकेट देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने’, नवाब मलिकांचा आरोपाने खळबळ, अखेर मलिकांनी हायड्रोजन बॉम्ब फोडलाच

मुंबई, प्रतिनिधी : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बनावट नोटांचं रॅकेट चालवत होते असा गंभीर आरोप करत देवेंद्र फडणवीसांवर हायड्रोजन बॉम्ब टाकला. नवाब मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांचे अंडरवर्ल्ड कनेक्शनचा हायोड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचं जाहीर केलं होतं.

नवाब मलिकांनी म्हटलं, अत्यंत गंभीर आरोप करत आहे मी देवेंद्र फडणवीस तुमच्यावर, जेव्हा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली तेव्हा मोदीजींनी सांगितलं की दहशतवाद, काळापैसा संपवण्यासाठी नोटबंदी लागू करत आहे. नोटबंदीनंतर देशाच्या विविध भागात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. मध्य प्रदेश, तमिळनाडूत बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पण 8 ऑक्टोबर 2017 म्हणजेच जवळपास 1 वर्षापर्यंत राज्यात एकही बनावट नोटांचं प्रकरण समोर आलं नाही. 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली यावेळी 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांचं कनेक्शन हे आयएसआय, पाकिस्तान, दाऊद वाया बांगलादेशमार्फत देशभरात पसरवले जात आहे. 8 ऑक्टोबरच्या छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. 14 कोटींच्या बनावट नोटा जप्त, प्रत्यक्षात 8 लाख 80 हजार दाखवले गेले. मुंबईत एक पुण्यात एकाला अटक केली. यामध्ये इमरान आलम शेख, रियाज शेख आणि नवी मुंबईतून एकाला अटक केली. मात्र, 14 कोटी 56 लाख पकडले गेले आणि 8 लाख 80 हजार सांगत प्रकरण दाबलं गेलं असंही नवाब मलिकांनी म्हटलं.

नवाब मलिकांनी पुढे म्हटलं, पाकिस्तानच्या बनावट नोटा भारतात चालवल्या जातात… या प्रकरणात गुन्हा दाखल होतो आणि त्यातील आरोपींना काही दिवसांत जामीन मिळतो. हे प्रकरण एनआयएला दिलं जात नाही. प्रकरणाचा तपास होत नाही. याचं कारण म्हणजे जे लोक हे रॅकेट चालवत होते त्यांना तात्कालीन सरकारचं संरक्षण होतं. असं सांगितलं गेलं की, पकडलेला काँग्रेसचा नेता आहे. काँग्रेसच्या नेत्याला पकडलं गेलं नाही पण असं होतं की, पकडला गेला तर काँग्रेस नेत्यांवर बिल फाडा. बनावट नोटांच्या प्रकरणातील आरोपी इम्रान आलम शेख हा अल्पसंख्यांक आयोगाचा अध्यक्ष बनवलेल्या हाजी अराफत शेख याचा छोटा भाऊ आहे. हाजी अराफत शेख याला देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षात घेत अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवलं असंही नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिकांनी म्हटलं, मी देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला विचारु इच्छितो की, रियाज भाटी कोण आहे? 29 ऑक्टोबर रोजी सहार एअरपोर्टवर बनावट पासपोर्टसह पकडण्यात आलं. त्याच्यावर दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. डबल पासपोर्टसह एखाध्या व्यक्तीला पकडलं जाईल आणि दोन दिवसांत सुटला जाईल यामागे कोणता खेळ होता. रियाज भाटी तुमच्या सोबत सर्वच कार्यक्रमात का दिसत होता. रियाज भाटी भाजपच्या सर्व कार्यक्रमात कसा दिसत होता. देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात रियाज भाटी कसा उपस्थित होता. पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला.

गुंडांच्या मार्फत वसुलीचं काम

देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना सरकारी पदावर बसवलं. तुम्ही रियाज भाटीच्या माध्यमातून वसुलीचं काम केलं. ठाण्यात पोलीस आयुक्त बसवत वसुलीचं काम केलं. विदेशातून गुंडाच्या मार्फत फोन करुन इकडे सेटलमेंट पोलीस करत होते आणि तुमच्या आशीर्वादाने हे सर्व प्रकरण राज्यात सर्रास सुरू होतं असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यासोबत संबंध असलेला व्यक्ती पंतप्रधानांच्या कार्यक्रमात पोहोचतो म्हणजे त्याला कुणाचा तरी आशीर्वाद होता त्यामुळेच तो कार्यक्रमात पोहोचला. दाऊद इब्राहिमचा खास आहे रियाज भाटी. त्याच्याविरोधात अनेक तक्रारी आहेत रियाज भाटी याचे. आज तो फरार आहे. ठाण्यातून जेवढी वसुली होत होती त्याच्यातील तो एक प्रमुख व्यक्ती होता असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!