Mucormycosis चा धोका वाढतोय : राज्यात पहिला रुग्ण आढळला !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई/वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून म्युकोरमायकोसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आजाराबाबत ऐकायला मिळत आहे त्यात, राज्यातही आता या आजराचा पहिला रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून कोरोनाची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर देखील होत असून यामध्ये रुग्णांचे डोळे निकामी होत असल्याच्या घटना समोर येत आहे.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका ५६ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. ती महिला कोरोनावर उपचार घेत असताना तिच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे समोर आले. याची रुग्णालयाने गांभीर्याने दाखल घेत त्यांच्या काही चाचण्या केल्या. या चाचणी अहवालातून त्यांना म्यूकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याची समोर आले आहे. या महिलेवर कोरोनाचे उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु आहे. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी त्या महिला रुग्णांची तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेचे डोळे वर आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच त्यांच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नव्हती. तसेच लाईट दाखवल्यानंतर देखील त्यांच्या डोळ्यातील बाहुलीची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यानंतर त्यांचे सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या मास पेशींना सूज असल्याचे दिसून आले. या सर्व बाबींवरून त्या महिलेला म्युकोरमायकोसिस हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या म्युकोरमायकोसिस झालेल्या या महिलेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
म्युकोरमायकोसिसची लक्षणे ?
या विषारी बुरशीमुळे परिणामी नाक, डोळ्यांभोवती सूज येते तसेच डोळेही लाल होतात. त्यासोबतच ताप, डोकेदुखी, कफ, श्वास घेण्यासाठी त्रास होणे, रक्त्याच्या उलट्या होणे आमि मनासिक स्थिती बदलत राहणे यासारखे परिणाम होतात.
परिणाम का होतो ?
- मधुमेह अनियंत्रित होण्यावर परिणाम
- स्टेरॉईड्समुळे रोग प्रतिकारक शक्तीवर प्रभाव
- सहव्याधींमुळे वाढ होणे