भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

भूखंड घोटाळ्यात फडणवीसांचीही चौकशी करा, अंजली दमानियांची कोर्टात मागणी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

पुणे (वृत्तसंस्था)। माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव आलेल्या भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. फडणवीसांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी तक्रारदार अंजली दमानिया यांनी वकील अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत न्यायालयात लेखी मागणी केली. (Devendra Fadnavis likely enquiry by ACB Anjali Damania Complaints)

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे- मिनिट्स ऑफ मीटिंग रद्द करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असा आरोप अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यामुळे एसीबीने भूखंड घोटाळ्यात कोणाची चौकशी करणं आवश्यक आहे, याची यादीच सरोदेंनी न्यायालयात दिली. भूखंड घोटाळा प्रकरणी आता कोणाची चौकशी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन कागदपत्रे आणि व्यवहार प्रक्रिया तपासली जाणार असून यावर 23 फेब्रुवारीला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना 30 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे ईडीचे समन्स मिळाले होते. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. एकनाथ खडसेंनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली होती. ईडीची नोटीस आल्याचे एकनाथ खडसेंनी मान्य केले होते. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वीच एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ईडीनं त्यांना 14 दिवसानंतर हजर राहण्याची मुभा दिली होती.

“माझ्या बायकोने भोसरी या ठिकाणी एक भूखंड खरेदी केला आहे. त्याबाबत ही नोटीस दिली आहे. त्या यापूर्वी चार वेळा चौकशी झाली आहे. ही पाचव्यांदा चौकशी होत आहे. हा व्यवहार रेडी रेकनरच्या दरानुसार पाच कोटींचा आहे. ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करु. मी जास्त काही बोलणार नाही. जे काही आहे ते नंतर बोलेन,” असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!