ब्रेकिंग : एकनाथ खडसें, संजय राऊत यांचे फोन टॅप, गुन्हा दाखल
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे देखील फोन टॅप केल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
फोन टॅपिंग प्रकरणी पुणे पोलिसातील बंडगार्डन पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात 25 मार्चपर्यंत कारवाई करु नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. दुसरीकडे मुंबईमध्ये रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅपिंगच्या आरोपाखाली रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्ट खाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन 2019 मध्ये टॅप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे फोन टॅप झाल्याचा एफआयर मध्ये उल्लेख आहे, अशी माहिती समोर आलीय. आता थेट संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे देखील फोन टॅप करण्यात आल्याचं समोर आल्यानं यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालीय.
रश्मी शुक्ला यांनी संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन 2019 मध्ये टॅप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. टेलिग्राफ अॅक्ट खाली रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळं आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.