भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यप्रशासनराजकीय

मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; राज्यात पुन्हा होऊ शकतो ‘लॉकडाऊन’ !

मुंबई (वृत्तसंस्था)। देशासह राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून अद्याप नियंत्रणात आलेला नाहीये. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन हटवला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन हटवण्याची काहीही घाई नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्यासोबत शनिवारी एक बैठक घेतली. यावेळी पुन्हा लॉकडाऊन केला पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण झाली, कोरोनाची लागण फक्त ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना होत नाही. यामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आहे, याचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना हा कुणालाही होऊ शकतो. सहा महिन्याच्या बाळापासून ते कोणत्याही वयाच्या व्यक्तिला कोरोना होऊ शकतो. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीत दुसरी लाट येऊ द्यायची नाही. महाराष्ट्रात कोरोनाची पहिलीच लाट आहे. सध्या ही दुसरी लाट कशी थोपवायची याची आपली तयारीही सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचा सर्वाधिक फटका गरीबांना बसला आहे. जर शाळा सुरू झाल्यावर शाळेत कोरोनाचा संसर्ग फैलावला किंवा कार्यालये उघडल्यानंतर त्यात कोरोनाचा संसर्ग वाढला तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याऐवजी आपण मिशन बिगिन अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करत आहोत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!