भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

आता १५०० स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधकांमासाठी परवानगीची गरज नाही!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सध्या घर बांधण्याचा विचार करणार्‍या लोकांचा सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचा त्रास आता वाचणार आहे. सरकारने यासंदर्भात नवीन घोषणा केली आहे आता राज्यात १५०० स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधण्यासाठी कसल्याही परवानगीची आवश्यकता भासणार नाही. (no need for government permission for build house up to 1500 square feet) याबाबतची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते ते म्हणाले, औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. ‘३१ डिसेंबर २०२० पर्यंतची सर्व बांधकामे नियमित होतील. त्याचबरोबर येथून पुढे जर १५०० स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधायचे असेल तर महापालिकेच्या परवानगीची गरज भासणार नाही’, असे शिंदे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या या निर्णयामुळे अनेक छोट्या ग्राहकांचा सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याचा त्रास वाचणार आहे. याचा फायदा राज्यातील ५५ हजार कुटुंबांना फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त ३ हजार स्क्वेअर फुटापर्यंत घरे बांधणार्‍यांसाठी १० दिवसांत परवानगी देण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!