झालेल्या प्रकार विचित्र! रक्षा खडसेकडुन तीव्र नाराजी व्यक्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। रावेरच्या भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्या नावाचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा प्रकार समोर आल्या नंतर वातवरण तापले असून संताप व्यक्त होत आहे, घडलेल्या या प्रकरणावर रक्षा खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, भाजपकडून ही चूक झाली नसावी, असा दावाही त्यांनी केला.
मला बुधवारी संध्याकाळी ही गोष्ट लक्षात आली आहे.मी भाजपची अधिकृत वेबसाईट चेक केली होती. त्यावेळी मला असं काही दिसलं नाही. भाजपकडून हे करण्यात आलेलं नाही. माझ्याकडे जे मेसेज आले आहे. त्यामध्ये ‘सेव्ह महाराष्ट्र फॉर्म बीजेपी’ या पेजवरून याचे स्क्रीन शॉट शेअर करण्यात आले आहे. हे पेज कोण चालवत आहे, ते माहिती नाही. या पेजवरून ही बातमी व्हायरल करण्यात आली आहे’ असा आरोप रक्षा खडसेंनी केला. झालेल्या प्रकार हा वाईट आणि विचित्र होता. एका महिलेच्या संदर्भात कोणी विरोधक किंवा सत्ताधारी असेल अथवा तिथे कुणीही असेल त्यांनी हे व्हायरल करण्याची कोणतीही गरज नव्हती. एका महिला म्हणून, एका खासदारावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. त्यामुळे दु:ख वाटले’ अशी नाराजीही पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी व्यक्त केली.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रक्षा खडसे यांच्या मतदार संघाचा चुकीचा उल्लेख केल्यामुळे भाजपला तातडीने हटवण्याची विनंती केली होती. तसंच या प्रकरणी कारवाईचा इशारा सुद्धा दिला होता. या प्रकरणावर पोलीस चौकशी करत आहे, पक्ष सुद्धा यावर खुलासा करणार आहे. जे कोणी दोषी असतील त्यावर नक्की कारवाई केली पाहिजे, असंही रक्षा खडसे म्हणाल्या.