भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

बर्ड फ्लूची महाराष्ट्रात एंट्री; परभणीत 800 कोंबड्या दगावल्या!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

परभणी (वृत्तसेवा) : राज्याला आता कोरोनाशी सामना कारण्यासोबत बर्ड फ्लूचे संकट उभे ठाकले आहे. परभणीमधील मुरंबा गावात 800 कोंबड्या मृत्य अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल समोर आला असून त्यात बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला, अशी अफवा असतानाच पशुसंवर्धन विभाग आणि प्रशासनाने पक्षांची नमुने, पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला, असे आता निष्पन्न झाले आहेय, त्यानंतर आता प्रशासनाने खबदारी म्हणून पावलं उचलली आहे. बर्ड फ्लूचा फैलाव होऊ नये म्हणून मुरुंबा गावातील 10 हजार कोंबड्या आज संध्याकाळपर्यंत नष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाला त्या 1 किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहे.

तसंच, मुरुंबा येथे पोल्ट्री फार्ममध्ये मृत कोंबड्या आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मुरुंबा गाव आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी असलेल्या नागरिकांना, बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात 10 जानेवारी रोजी पोल्ट्री फार्ममधील 400 कोंबड्या अचानकपणे  दगावल्यामुळे लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पशुवैद्यकीय पथकाने पाहणी करुण नमुने घेतले असून कोंबड्या दगावल्याने लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी परिसरात अलर्ट झोन जाहीर करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!