भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ब्रेकिंग : राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त ; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा, इंधनावरील ‘व्हॅट’ घटवला

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेला मोठी भेट दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करामध्ये ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि ३ रुपयंनी कमी होणार आहेत. कॅबिनेट बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यात काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय़ घेण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार लवकरच या दरात कपात करण्यात येईल. केंद्र सरकारने इंधनाच्या दरात आधीच कपात केली होती. त्यानुसार राज्य सराकरांनाही दरकपातीचं आवाहन केलं होतं. मात्र मविआ सरकारने या आवाहानाला प्रतिसाद दिला नव्हता. आता भाजप-शिंदे गटाचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिलासादयक निर्णय घेतला असून ही इंधनदरात कपात केली आहे.

याबाबत घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पेट्रोल डिझेलचे दर हे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून आहेत.   केंद्राने ४ नोव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ रोजी केंद्राने करात कपात केली होती. त्यानंतर राज्यांनाही आवाहन केलं होतं. काही राज्यांनी कर कमी केले होते. मात्र महाराष्ट्रात ते कर कमी झाले नव्हते. आज आम्ही पेट्रोलवरील करात ५ रुपये आणि डिझेलवरील करात ३ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल ५ आणि डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!