मोठी बातमी : महाराष्ट्रात लवकरच भाजपचं सरकार येणार ?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : एकनाथ शिंदेंनी स्वपक्षीय सरकारविरोधात पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातलं सध्याचं महाविकास आघाडी सरकार धोक्यात असून लवकच भाजपचं सरकार येणार अशी माहिती मिळत आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची त्यांनी भेट घेतलीय. तसंच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर भाजप आणि शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युलाही ठरल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे राज्यात लवकरच सत्तापालट होणार अशी दाट शक्यता आहे.
- ब्रेकिंग : जळगाव जिल्हा परिषदेचा अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, जिल्हा परिषदेत खळबळ !
- Love Jihad ! उत्तरप्रदेश, गुजरात नंतर महाराष्ट्रातही लवकरच ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा, समिती स्थापन !
- बांगलादेश येथील हिंदूंचे रक्षण करावे– फैजपूर येथे हिंदु जनजागृती समिती, इस्कॉन आणि हिंदुत्ववादी यांची निवेदनाद्वारे मागणी
महाराष्ट्रातल्या राजकारणावर दिल्लीतही वेगवान घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ वकील राम जेठमलानी यांचे पुत्र महेश जेठमलानीही दिल्लीला गेले आहेत. नव्या संभाव्य सरकारचा मंत्रीपदाचा फॉर्म्युलाही समोर आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री असतील तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची यांनी एका दिवसात आघाडीतून बाहेर पडून युतीचा निर्णय घ्या असा इशाराच पक्षाला दिला आहे.
राज्याचे विरोधी पक्ष नेत देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झालेले असतानाच इकडे भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनीही लवकरच दोन ते तीन दिवसात राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचे सूचक विधान केले आहे. त्यात पुन्हा भाजपचे नेते सुधिर मुनगंटीवार यांनीही एक सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, “भाजपला सध्या तरी बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही. महाविकास आघाडीचे अल्पमत केव्हा उघडे पडेल, याची आम्ही वाट पाहतोय” असेही मुनगंटीवार म्हणाले.