भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मी पक्षप्रमुखासह मुख्यमंत्री पद सोडायला तयार– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्तानाट्यासंदर्भात फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेचे बहुतांश आमदार गेले आहेत. त्यांनी सांगावे मुख्यमंत्री पद सोडा. पक्षप्रमुख पद सोडा मी या क्षणी ते सोडायला तयार आहे असे सांगत. उद्धव ठाकरे यांनी थेट फेसबुक लाईव्ह करत राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेत आपली भूमिका स्पष्ट केली असून एक बंडखोर आमदारांना आव्हान करत भावनिक साद घातली आहे.

शिवसेना आणि हिंदुत्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अयोध्येला जाऊन आले. विधानसभेत हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहेत. समोर येऊन माझ्याशी संवाद साधा. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो. संध्याकाळी बंडखोरी केलेल्या आमदारांनी यावं. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळ हा माझ्यासाठी गौण आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर

समोर येऊन माझ्याशी संवाद साधा. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो. संध्याकाळी बंडखोरी केलेल्या आमदारांनी यावं. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळ हा माझ्यासाठी गौण आहे.

आता अनेक आमदार फोन करत आहेत. आपण शिवसेना प्रमुखाला दिलेले वचन पूर्ण करणार आहे. शरद पवार आणि नंतर सोनिया गांधी यांच्या विनंतीवरून आपण मुख्यमंत्रीपद सांभाळले असल्याची माहिती त्यांनी दिली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने नव्हे तर आपल्याच लोकांनी आपण मुख्यमंत्रीपद नको हवे असे म्हटल्याचे आपल्याला खूप वाईट वाटल्याचे ते म्हणाले. कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ असल्याचे ते म्हणाले. आपण राजीनाम्याचे पत्र तयार करत असून बाहेर गेलेल्यांनी हे पत्र राज्यपालांना द्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!