भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग : उद्याच बहुमत चाचणी होणार– सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : सुप्रीम कोर्टाने आज सर्वात मोठा निर्णय दिला आहे. शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर जवळपास चार तास युक्तीवाद झाला. अखेर चार तास चालेल्या जोरदार युक्तीवादानंंतर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने उद्या बहुमत चाचणी होणारच, असा निकाल दिला आहे. घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला असताना सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. ही एक ऐतिहासिक सुनावली मानली जात होती. अखेर सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या निर्णयाला योग्य ठरवत बहुमत चाचणीला स्थगिती देता येणार नाही, असा निकाल दिला. त्यामुळे महाविकास आघाडीला हा सर्वात मोठा झटका आहे.

आता उद्‍या सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीला बहुमत चाचणीला सामाेरे जावे लागणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी गुरुवारी महाराष्‍ट्र सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे, असे आदेश दिले होते. या विरोधात शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्‍यायमूर्ती सूर्यकांत आणि जे. बी.पारदीवाला यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सुनील प्रभु यांच्‍या याचिकेवर सायंकाळी पाच वाजता सुनावणी सुरु झाली. तब्‍बल साडेतीन तास दोन्‍ही बाजुने युक्‍तीवाद झाला. यानंतर रात्री ९ वाजता निकाल दिला जाईल, असे सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. सुरुवातीला सुनील प्रभु यांच्‍या वतीने ॲड. अभिषेक मनु सिंघवी यांनी तर शिंदे गटाच्‍या वतीने ॲड. नीरज किशन कौल यांनी युक्‍तीवाद केला. तर राज्‍यपालांच्‍या वतीने सॉलिसिटर जनरल यांनी बाजू मांडली. साडेतीन तासाच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असून महाविकास आघाडीला उद्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे आता महाविकास सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!