भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

शिवसैनिकांनो माघारी फिरा… मार्ग काढू : उद्धव ठाकरेंचे बंडखोरांना आवाहन

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांना आवाहन करत माघारी येण्याचे आवाहन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी पुन्हा एकदा सर्व आमदारांना समोर येवून बसू, बोलू, मार्ग काढू असे आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकात म्हणाले आहे की,


शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो, आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो.

कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू. असे आवाहन ठाकरे यांनी आमदारांना केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!