भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राजकीय आकसाने मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी संरक्षण काढले, काही झाल्यास तुम्ही जबाबदार, एकनाथ शिंदेचे गंभीर आरोप

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे ट्विट शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्याचवेळी त्यांनी घटक  पक्षावर गंभीर आरोप केला आहे.

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आमदारांच्या कुटुंबीयांना काही झालं तर मुख्यमंत्री, शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत जबाबदार असतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते आणि करत आहेत, असेही ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना आज नोटीस पाठविण्यात येणार आहे. 27 जूनपासून विधानसभा उपाध्यक्षांपुढं सुनावणी होण्याची शक्यता आहे. बंडखोरांच्या निलंबनाबाबत कायदेशीर लढाई सुरु झाल्याचा शिवसेनेने दावा करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!