भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

‘कोणाला घाबरवताय… तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही’, एकनाथ शिंदेचे प्रतिउत्तर

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : “कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत”, असं ट्वीट करत शिवसेनेतुन बंड पुकारलेले नेते एकनाथ शिंदे त्यांनी त्यांच्या समर्थक आमदारांवरील कारवाईवर ठाकरे सरकारला उद्देशून जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे आमदारांचा नंबर गेम खेळत असताना दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. कालच्या भाषणात ठाकरेंनी भावनिक साद घातल्यानंतर अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उद्धव ठाकरें समर्थक शिवसेना आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली आहे. या मागणीनंतर एकनाथ शिंदेंनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

“12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत”, असंदेखील ते म्हणाले. “आम्ही कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे”, असं शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे ट्विटमध्ये काय म्हणाले ?

कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!. घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.

12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.

कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.

असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. एकनाथ शिंदेंच्या या ट्विटनंतर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!