भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

“काळ आला होता भाऊ किंवा भाईंवर, पण मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार” भाजप नेत्याचं सूचक ट्विट

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : विधान परिषदेच्या मतदानाला सुरूवात झाली असून त्याआधी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. “काळ आला होता भाऊ किंवा भाईंवर, पण मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार”, असं खासदार अनिल बोंडे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

अनिल बोंडे यांनी विधान परिषद निवडणुकीत कुणाचा पराभव होणार याचं भाकित वर्तवलं आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहे. आकडेवारीचं गणित पाहता महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे या लढाईतून कोण बाहेर पडणार याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अश्यातच अनिल बोंडे यांनी हे सूचक ट्विट केलं आहे.

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश पाडवी हे रिंगणात आहेत.तर काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे निवडणूक लढवत आहेत. संख्याबळ पाहता काँग्रेसचा एक उमेदवार पराभीत होईल, असा अंदाज आहे. त्यावरच भाष्य करणारं आणि निवडणुकीच्या निकालाचं भाकित वर्तवणारं ट्विट अनिल बोंडे यांनी केलं आहे. मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे तडजोड करतील, असं बोंडे यांचं म्हणणं आहे. भाई जगताप किंवा चंद्रकांत हंडोरे यांच्या हातून निवडणूक निसणार असल्याचं बोललं जात आहे. पण तसं न होता आमश पाडवी यांचा या सगळ्या राजकारणात राजकीय बळी जाणार, असं बोंडेंनी म्हटलंय.

भाजपला स्वतःचे संख्याबळ आणि सोबतचे अपक्ष मिळून ११२ एवढे संख्याबळ असल्याने पाचव्या जागेसाठी १८ मतांची गरज आहे. आज सकाळी ९ वाजता विधानभवनात मतदानास सुरुवात झालीय, तर रात्री साधारण ८ पर्यंत निकाल अपेक्षित आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!