सावरकर काय हे, आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला कळणे अशक्यप्राय– चित्रा वाघ
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राहुल गांधी यांची आज तीन तास चौकशी झाली. या चौकशीदरम्यान त्यांना 55 प्रश्न विचारण्यात आले. ही चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. सरकारविरोधात घोषणाबाजी केली. भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सावकरकांचा दाखला देत या सगळ्याचा समाचार घेतला.
- सावदा केंद्राचा विज्ञान शाखेचा १००% तर कला शाखेचा ७३% निकाल, निकालात मुलीची बाजी …!!
- कोटेचा महिला महाविद्यालयाची बारावीची यशाची परंपरा कायम….
- आ. अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून रावेर आगारात ५ नवीन एसटी बस दाखल
यावेळी त्यांनी सावरकरांच्या एका कृतीचा आधार घेतला आहे.50 वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली तेव्हा शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाला “तुमचे राज्य तरी 50 वर्षे टिकेल काय?, असा सवाल विचारल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तर असा परखड सवाल विचारणारे सावरकर आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला कळणे अशक्यप्राय आहे”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सावकरकांचा दाखला देत गांधी घराण्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी सावरकरांच्या एका कृतीचा आधार घेतला आहे. 50 वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली तेव्हा शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाला “तुमचे राज्य तरी 50 वर्षे टिकेल काय?, असा सवाल विचारल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तर असा परखड सवाल विचारणारे सावरकर आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला कळणे अशक्यप्राय आहे”, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. “राहुल बाबा पूछताछ से रोता है क्या? आगे आगे देखो होता है क्या…”, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.