भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

‘अरे ओवैसी सुन ले, कुत्ता भी न पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर… भगवा लेहरायेगा हिंदुस्तान पर– फडणवीस

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : काल शिवसेनेच्या सभेनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी मुंबईत उत्तर सभा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला, या सभेत बोलताना फडणवीस यांनी ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे जाहीर दर्शन घेतलं यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरलं. औवेसीवर फडणवीस यांनी जोरदार घणाघात केला आहे.

‘जो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत होते त्यांनी तलवार म्यान केली असेल. पण आम्ही आमच्या तलवारी म्यानबंद केलेल्या नाहीत. आम्ही सामना करणार आणि खंबीरपणे करणार. औवेसी ऐकून घे औरंगजेबच्या समाधीवर कुत्राही लघुशंका करणार नाही, आता पूर्ण हिंदुस्तानात भगवा फडकणार, या शब्दात फडणवीस यांनी लक्ष केले आहे.

छत्रपती संभाजी राजांना औरंगाजेबाने मारले, औरंगजेब संभाजींना फक्त धर्म बदलायला सांगत होता. पण संभाजींनी धर्म बदलला नाही. संभाजी राजांनी जीव गेला तरी स्वराज्य आणि स्वधर्म देणार नाही, असं सांगितलं. संभाजी राजांची निर्घृण हत्या करणाऱ्या औरंगजेबच्या समाधीवर तो असदुद्दीन औवेसी जातो आणि माथा टेकतो. अरे लाजा बाळगा, बघता काय? ग्लासभर पाण्यात डुबकी मारा. औवेसी ऐकून घे औरंगजेबच्या समाधीवर कुत्राही लघुशंका करणार नाही, आता पूर्ण हिंदुस्तानात भगवा फडकणार, असंही फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!