शिवसेनेच्या चिन्हावर निर्णय घेऊ नका, राज्याच्या सत्ता संघर्षावर सोमवारी सुनावणी
नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली यादरम्यान निर्णय येई पर्यंत शिवसेनेच्या चिन्हावर निर्णय घेऊ नका, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहे. आता या प्रकरणावर येत्या सोमवारी सुनावणी असून, सोमवारी ८ ऑगस्ट ला सुप्रीम कोर्ट घटनापीठावरही निर्णय घेण्याची शक्यता आहे.
शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आणि आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला. त्यामुळे शिवसेना कुणाची? असा प्रश्न उपस्थितीत केला गेला आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेनेच्या निर्णयाबद्दल कोणताही निर्णय़ घेऊ नका, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तसंच या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. तसंच, दोन्ही गटांच्या लिखित युक्तिवादावर निर्णय घेतला जाईल, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे निर्णय जाणार की नाही, याबद्दल सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे वाद सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला. एकूण 5 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली शिंदे गटाच्या वतीने वकिल हरिश साळवे, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल, मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. तर राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी बाजू मांडली. यावेळी हरीश साळवे यांना लेखी युक्तिवाद सादर करण्यास आले.
शिंदे गटाच्या वतीने साळवे यांनी आज (४ ऑगस्ट) नव्याने आपला युक्तिवाद मांडत काही मुद्दे उपस्थित केले. सदस्याने पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात मत दिल्याच्या निष्कर्षावर अध्यक्षांना १० व्या सूचीनुसार अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का? अशी विचारणा हरिश साळवे यांनी केली आहे