परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासह संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे. परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडसत्र सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
- महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांचा झंझावात, ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
- वीस हजारांची लाच घेताना वायरमनला एसीबी कडून अटक, जळगाव जिल्ह्यातील घटना
- मोठी बातमी : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं आहे. त्यासोबतच वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी आणि दापोलीतही ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, अनिल परबांच्या पुण्यातील मालमत्तांवरही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे वांद्रे येथील घरी नसल्याची माहिती मिळत आहे. ED चे अधिकारी आले तेव्हा अनिल परब घरी नव्हते. वांद्रे येथील अनिल परब यांच्या घरी ED च्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत.
आगामी महानगरपालिकेपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेला एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.ईडीकडून अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये अनिल परब यांच्या घराचाही समावेश आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे.