भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं समर्थन कसं? एकनाथ शिंदेंचा सवाल

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना केलाय.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. दोन्ही बाजूंनी टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका सुरु आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एक सवाल केलाय.

‘मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर’, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

‘हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू…’, असंही शिंदे यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये आहेत. नवाब मलिक यांचे डी गँगसोबत संबंध होते, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. हसीना पारकर, सरदार शाहवली खान यांच्यासोबत नवाब मलिक यांच्या बैठका झाल्या असल्याचा ठपका ईडीनं नवाब मलिक यांच्यावर ठेवलाय. ‘मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खानच्या संपर्कात होते’ असा आरोप करण्यात आलंय. D गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!