ते शरद पवारांना सोडायला तयार नाही…! संजय राऊतांना योग्य वेळी चूना लावू; गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र
गुवाहाटी, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्यात राजकारणात तापले असतांना बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी त्यांनी वर्षा बंगला सोडला, सर्व सोडलं पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाही म्हणत उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. योग्य वेळी चुना लावू असे म्हणत राऊतांच्या टीकांचा गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला आहे.
गुलबराब पाटील गुवाहाटी येथे बोलत असतांना म्हणाले, ”आपण इथे कसे कसे आलो, हे मला सांगण्याची गरज नाही. हे सर्व सुरु असताना जिल्ह्यात मतदारसंघात आपल्यावर अनेक टीका टीप्पण्या होत आहेत. पण बरेच लोक आपल्या पाठिशीही उभे आहेत. आपल्यावर अनेक टीका झाल्या, तुमची प्रेत काढू घेऊन, तुमचे बाप किती, पण आमच्या जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना माहिती नाही. शिवसेना प्रमुख्यांच्या आशिर्वादाने आपण या पदापर्यंत पोहचलो आहोत. पण हे बाळासाहेबांचे फोटो लावून मोठी झालेले आहे.
पण आपण बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन क्रिया केलेल कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आपल्याला मोठं करण्यात ८० टक्के जरी संघटनेचा हात असला तरी २० टक्के त्यात आपलेही कष्ट आहेत. संजय राऊत यांनी जळगावमध्ये ४७ डिग्री तापमानात ३५ लग्न लावावीत मी त्यांना ७२ समजून घेईल. त्या काळात आम्हीच लग्न लावतो. ज्यावेळी रात्री १२ वाजता कोणाला रक्ताची गरज पडते, त्यावेळी आमचा मोबाईल सुरु असतो. कार्यकर्त्यांच लग्न असेल, दु:ख असेल, वा मरण असेल तिथे आम्ही असतो.
ज्यावेळी मैदानात उतरु त्यावेळी आपण ३९ आणि ११-१२ अपक्ष आमदार त्यांच्यावर भारी पडू. त्यांनी वर्षा बंगला सोडला, सर्व सोडलं पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाही. मग आम्ही काहीच केलं नाही का त्यांच्यासाठी, ज्यावेळी आमची परिस्थिती चांगली नव्हती त्यावेळी आम्ही काय काय नाही केलं त्यांच्यासाठी, आम्हाला जे मिळालं त्यात शिवसेना प्रमुखांचा हात आहे पण त्यात आमचाही काहीतरी त्याग आहेच ना,आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलेले लोक आहोत. आयत्या बिळात नागोबा वाले लोक नाहीत आम्ही, मला पुन्हा टपरीवर पाठण्याची संजय राऊत भाषा करतात, पण चुना कसा लावायचा हे माहिती नाही त्याला अजून, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
पण आमची स्टोरी संजय राऊतांना सांगितली तर १९९२ च्या दंगलीत आम्ही तीघं भाऊ आणि आमचा बाप जेल मध्ये होतो. त्यावेळी संजय राऊत कुठे होते ते माहिती नाही, कलम ५६ काय असतं, ३०२ काय असतं हे संजय राऊतांना माहिती नाही. दंगलीच्या वेळेत पायी चालण काय असतं हे संजय राऊतांना माहिती नाहीत, तडीपार काय असतं हेही संजय राऊतांना माहिती नाही, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.