ब्रेकिंग : देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या बंडानंतर आता या सगळ्या राजकीय गोंधळात भाजपाची थेट एन्ट्री होताना दिसत आहे. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस व भाजपचे नेते थेट राजभवनात दाखल झाले आहेत. राज्यातल्या राजकारणात आता ते अॅक्टिव्ह होताना दिसत आहेत.
राज्यात सत्तानाट्यात आता वेगवान हालचाली पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवरुन परतल्यानंतर आता थेट राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. दिल्लीत फडणवीसांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केलीय. त्यानंतर तातडीने ते मुंबईत दाखल झाले. आता ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार राजभवनच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे आता सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतल्यानंतर आता ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. एवढ्या दिवस शांत असलेल्या भाजपने हालचाली सुरू केल्याने आता सर्वांच्या नजरा भाजकडे गेल्या आहेत.
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू उद्या गुवाहटीवरून मुंबईला येणार असल्याची माहिती आहे. तर उद्या विदर्भातील भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईला येण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरात आज भाजप आमदारांची बैठक घेतली आहे. बैठकीनंतर सर्व आमदारांना मुंबईत बोलावल्याची माहिती आहे